Friday, February 18, 2011

केसरबाई-२


उद्घाटनाच्या दिवशी रंगमंचावर फक्त एक तंबोरा जुळवून ठेवला होता . "" आता सुरश्री केसरबाईनी ह्या संगीतविभागाचे उद्घाटन हा तंबोरा छेडून करावे , "" अशी मी त्यांनी विनंती केली . माई खूप थकल्या होत्या , तरीही वेशभूषेत आणि रूबाबात कुठे उणेपणा नव्हता .

तंबोऱ्याच्या दिशेला मी त्यांना घेऊन जाता जाता मला विचारतात , "" अरे , तो तंबोरा नीट सुरात लावलाय ना रे बाबा ? "" कुणीतरी आपल्या मगदुराप्रमाणे तो लावला होता . त्यांनी तारा
छेडल्या आणि माझ्याकडे असे पाहिले की ` धरणी दुभंगून मला पोटात घेईल तर बरं , ' असे मला वाटायला लागले . लोकांनी वाजवलेल्या टाळ्यांचा कडकडाटात तो तंबोरा कुणाला ऐकू
आला नाही हे नशीब . त्यानंतर खूप दिवसांनी एकदा भेटल्यावर मला म्हणतात , "" अरे , तुझ्या त्या युनवर्शिट तंबोरा लागायला लागला की अजून तसाच ? ""
अध्यक्षपदाचे वगेरे ठीक होते , पण ` पुतळ्याला पोज देता का ? ' हे कसे विचारायचे ? त्यांचा मेफिलीतला दरारा इतक्या परिचयानंतरसुध्दा कायम होता . लक्ष्मीबागेतल्या त्या मेफिली

मुंबईतले छगलांसारखे बॅरिस्टर , नामवंत सॉलिटर्स , निष्णात डॉक्टर्स , सर्जन्स धनिक भाटिये , नाना घराण्यांतले उस्ताद , त्यांचे शागीर्द , केसरबाईंचे मराठी , गुजराती , पारसी भक्त
त्यांतच विरोधी भक्ती करणारे काही लोक , गाण्यातील जागान््जाग टिपणारे निर्मळ मनाचे रसिक श्रोते . . . आणि भटवाडीतल्या लक्ष्मीबागेतल्या हॉलपुढल्या फुटपाथवर मांडी गालून
बसणारे आमच्यासारखे , मुंबईच्या भाषेत , ` कडका कंपनी ' तले लक्ष्मीचे सावत्र पुत्र .

आतल्या बेठकीतला दरारा बाहेरच्या फुटपाथवरच्या गर्दीपर्यंत पसरलेला . कुठे हूं नाही की चूं नाही . दादसुध्दा जायची ती महाराणींना नजराणा पेश केल्यासारखी . अनवट राग सुरू
झाला की जाणत्यांच्या दिशेने अजाणत्यांच्या भिवया प्रश्नार्थक होईन उंचावलेल्या . बाईना रागाचे नाव विचारायची हिंमत मुंबईच्या गोऱ्या पोलिस - कमिशनरालासुध्दा नव्हती . फालतू ,
उडाणटप्पू दादीला तिथे स्थान नव्हते . एक तर ते ` आहाउहू ' करायला लावणारे गाणेच नव्हते . धारापुरीतल्या त्रिमूतीपुढे उबे राहिल्यावर मनाची जी भावना होते तशी त्या गायकीला कान
आणि मन देऊन बसल्यावर अवस्था होत असे . बाई कुणाची भीडमुवर्त बाळगणाऱ्या नव्हत्या , ते केवळ स्वभाववेशिष्ट्यामुळे नव्हे . हा दबदबा त्या गायकीचाच होता . तशा त्या विलक्षण
हजरजबाबीही होत्या . गोव्यातल्या मत्स्य - संस्कृतीमुळे काटे काढणे उत्तम जमायचे . मेफिलीत कुणी आलतूफालतूपणा किंवा गेरसलगी दाखवली तर तिथल्या तिथे काटा काढीत .

उतारवयातल्या त्यांच्या एका मेफिलीत त्यांच्याच वयाच्या पण किंचित आगाऊ श्रोत्याने त्यांना ठुमरी गाण्याची फर्माइश केली . खास मुंबई वळणाच्या गुजरातीत त्या गृहस्थांना त्या म्हणाल्या ,
"" शेटजी , ठुमरी ऐकायचं तुमचं वय निघून गेलं आणि ठुमरी गायचं माझं वय निघून गेलं . आता भजनं ऐका . "" नाशिकला झालेल्या एका मेफिलीत मी त्यांची बनारसी ढंगाची अप्रतिम
ठुमरी ऐकलेली आहे . पण ठुमरीची फर्माइश ? अब्रम्हण्यम् !

आता अशा ह्या माईंना ` पुतळ्यासाठी पोज देऊन बसा ' हे सांगायचे कसे ? पण त्यांचा पुतळा व्हावा आणि कलकत्याच्या कॉन्फरन्समध्ये किशोरवयापासून त्यांचे गाणे ऐकून त्या
गायनातल्या शिल्पाचे वेड्या झालेल्या शर्वरीबाबूंच्याच हातांनी ती मूर्ती घडावी असे मलाही वाटत होते . त्यात केसरबाईंचे वय झालेले . मधुमेह , रक्तदाब यांसारख्या वार्धक्यातल्या शत्रूंनी
शरीरावर हल्ले सुरू केलेले . हे भारतीय संगीताच्या सोन्याच्या पिंपळावरचे पान केव्हा गळून पडेल याचा नंम नव्हता . मी हिय्या केला .

"" माई , तुमच्याकडे एक काम आहे . ""
"" अध्यक्षबिध्यक्षाचं काय काढलं असशील तर चहा घे , पान खा आणि घरी जा . ""
"" तसंल काही नाही . शांतिनिकेतनात माझा एक शिल्पकार मित्र राहतो . त्याचं काम आहे . ""

शांतिनिकेतन म्हटल्यावर ते वृध्द डोळे चमकले . "" ते बघ , "" भिंतीवरच्या तसबिरीकडे बोट दाखवित त्या म्हणाल्या . रवींद्रनाथ टागोरांच्या हस्ताक्षराताला तो मजकूर होता .
"" रवीन्द्रमाथांसाठी माझं गाणं ऐकून काय लिहिलंय ते वाच . ""

No comments: