Friday, February 18, 2011

केसरबाई-१


केसरबाई केरकर ह्या नावाला भारतीय अभिजात संगीताच्या जगात काय अर्थ होता . हे सांगायला केसरबाईंच्या गानप्रतिभेच्याच उंचीची लेखनप्रतिमा हवी . संगीताच्या जगातला तो एक चमत्कार होता . म्हणावे , तर त्या जन्मजात प्रतिभेच्या जोडीला त्यांनी केलेल्या असामान्यत तपश्चर्येला गौणत्व येईल . बरे , नुसतीच जिवापाड मेहनत केली म्हणावे , तर त्यांच्या बुध्दि - मत्तेचा अनादर होईल . एक थोर गायनपरंपरा निष्ठेने उज्ज्वल करणाऱ्या होत्या म्हणावे तर त्यांच्यावर अंध गतानुगतिकेचा आरोप होईल , आणि त्या परंपरेची आणि अभिजात संगीताची निष्ठेने आणि डोळसपणाने उपासना करणाऱ्या इतर चांगल्या गायक - गायिकांचा अकारण उपमर्द केल्यासारखे होईल . शेवटी शब्दांच्या शक्तींच्या मर्यादा ध्यानात घेऊन एवढेच म्हणता येईल की केसरबाई आणि त्यांचे गाणे हे काय होते हे त्याच्यांसमोर मेफिलीत बसण्याचा ज्यांना योग आला त्यानांच माहीत . इथे गौरवाची रूढ विशेषणे पोकळ वाटायला लागतात .साडेतीन मिनिटांच्या तबकडीतून केसबाईच्या गाण्याचा अंदाज करणे हे जवळ जवळ चित्रातले फूल पाहून त्याच्या सुगधांचा अंदाज करण्यासारखे आहे . ते गाणे आणि त्या गायिकेचे दर्शन ह्यांतच एक विलक्षण अभेद होता . मेफिलीच्या स्थानी केसरबाईचे ते डौलदार - पणाने येणे म्हणजेच अर्धी मेफिल चजिंकून जाण्यासारखे असे . त्यांच्या गायकीचा भारदस्तपणा त्यांच्या वागण्यातून दिसे . केसबाईच्याविषयी बोलताना अनेकांना त्यांचे हे लोकविलक्षण` सम्राज्ञी ' पण जाणवल्याचे सतत आढळून येते . केसरबाई आणि त्यांचे गाणे सहजपणाने आणि चकाट्या पिटायच्या ओघात बोलायचा विषय नाही . कालिदास , भवभूती यांच्यासारख्यांच्या - विषयी शिळोप्याच्या गप्पांच्या वेळच्या सेलपणाने बोलता येत नाही . तेही कवी आणि नाटककारच . पण त्यांच्या निर्मितीतल्या गंभीरतेचा आपल्या मनावर असा काही संस्कार झालेला असतो की ते मनात शिरले तरी त्यांच्यात आणि आपल्यात आदरापोटी निर्माण
होणारे एक अंतर राहिलेले असते . केसरबाईच्या बाबतीतही तसेच होते . कलेच्या क्षेत्रातह` तपा ' चा म्हणून काही एक स्वतःचा अधिकार असतो . त्या तपाची साक्ष केसरबाईच्या पहिल्या षड्रजावरच्या ` आ ' कारातच पटायची . तेजःपुंज षड्रज . तंबोऱ्याच्या काही क्षणांच्या गुंजनानंतर पहिला षड्रज लागला की सारी मेफिल कुठल्यातरी अनिर्वाचनीय अनुभूतीचे दान आपल्या पदरी पडणार आहे ह्या अपेक्षेने आधीच कृतार्थ झालेली असायची .मध्यम उंची , गौरवर्ण , विलक्षण तेजस्वी डोळे , करारी जिवणी , ओठांच्या कडा पानाने किंचित अधिक आरक्त झालेल्या . कानांत हिऱ्याची कुडी , हातांत हिऱ्याच्या बांगड्या , बोटात हिऱ्यची आंगठी , गळ्यात फक्त एक मोत्यांची माळ , राजघराण्यातल्या स्त्रीसारखी उंची पण
शुभ्र किंवा मोतिया रंगाची साडी - डोकीवरून पदर घेतलेला , चालण्या - पाहण्यात त्या वेषाला साजेल असाच डौल , मेफिलितल्या एखाद्या परिचिताला ओळख दाखवलीच तर त्यातून मेहेरबानीच दिसावी अशा ढंगाची खानदाणी लकब - एकूण ` दबदबा ' हाच त्या साऱ्यातून साधला जाणारा परिणाम . हे दर्शन पुढल्या गाण्याच्या कोंदणासारखेच असायचे . ते गाणे
ऐकायला येणारा श्रोताही प्रत्यय तपःपूत कलाच देऊ शकते .माझे भाग्य मोठे म्हणून त्यांचे गाणे ऐकण्याचा आणि त्यांच्या पिरचयाचा योग लाभला .मला भास्करबुवा ऐकायला किंवा पाहायलाही मिळाले नाहीत . वझेबुवा त्यांच्या उत्तर वयात का होईना पण पाहायला मिळाले , ऐकायला मिळाले . मंजीखां आणि बूर्जीखां पाहायला आणि ऐकायला मिळाले . केसरबाई मात्र ऐकायला मिळाल्या , गप्पागोष्टी करायला मिळाल्या - मन मोकळे करून त्या माझ्याशी बोलल्या . त्यांचा पाहुणचारही लाभला . हे भाग्यच नाहीतर काय? इंग्लंडच्या महाराणीची आणि माझी ओळख होण्याची योग आहे असे जर एखाद्या ज्योतिषाने मला त्या काळी सांगितले असते तर त्याच्यावर मी विश्वास ठेवला असता एकादे वेळी ; पण केसबाई "" अरे खा रे पान . चुन्याने भाजली जीभ तर भाजू दे "" म्हणत मला पान जमवून देतील , त्यात भरपूर तंबाखू घालतील आणि "" मार पिचकारी त्या गॅलरीतून . . . कुणाच्या डोक्यावर पडणार नाही तेवढं बघ "" म्हणतील , हे साक्षात ब्रम्हदेवाने येऊन मला सांगितले असते तरी त्याच्यावर मी विश्वास ठेवला नसता . कसा ठेवणार ?
केसरबाईचे पहिले गाणे एका लग्नात ऐकले त्या वेळी मी बारा - तेरा वर्षांचा असेन . पण संगीत म्हणजे लेकुराच्या गोष्टी नव्हेत हे ठसवणारे त्यांचे बाह्यरूप आणि अंतर्दर्शन मनावर आनंदाच्या जोडीला एक भीतीचा ठसाही उमटवून गेले होते . हल्ली मी पाहतो , मेफिलीत येणारे कलावंत नम्रपणाने येतात , आदबीने येतात , शालीनतेने येतात . पुरूष कलावंतसुध्दा -विशेषतः तंतकार - अगदी ` बनठनके ' येतात . पण फेय्याझखां , थिरखवाखांसाहेब आणि गायिकांच्याच केसरबाई यांच्यासारखे नुसत्या येण्याने दबदबा निर्माण करणारे कलावंत क्वचित दिसतात . इथे नुसत्या देखणेपणाचा प्रश्न नाही ; एक प्रकारच्या डौलदार ` बेअरिंग ' चा आहे . दुसरे महायुध्द सुरू होण्यापूर्वीची गायनप्रेमी मुंबई काय होती हे ज्याने पाहिले असेल त्यालाच त्या मुंबईत केसरबाईचे संगीतक्षेत्रात काय स्थान होते ते ठाऊक असेल . मेफिलीत
तलम धोतर , डगला , डबल घोडा सिल्कचा शर्ट , त्याच्या कॉलरच्या काजाशी एखादे हिऱ्याचे बटण , काळी किंवा वेलबुट्टीची टोपी , पायांत पंपशू - असल्या वेशभूषेलाच मान्यता असलेला तो काळ . शास्त्रीय संगीत लोकाभिमुख करायला हवे वगेरे घोषणा सुरू होण्याआधीचा . त्या वेळी संगीत लोकाभिमुख नव्हते . संगीताभिमुख लोक गायक - गायिकांच्या शोधात असायचे .त्या काळातले सर्वच गायक आणि गायिक श्रेष्ठ होत्या असे मुळीच नव्हते .प्रत्येक काळात त्या त्या क्षेत्रांतील शिखरे असतात . आजही आहेत . पण एकोणीसशे तीस सालापासून ते अडतीस - एकुणचाळीसपर्यंतची आठ वर्षे ही जुन्या मुंबईच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाची शेवटची वर्षे .युध्द आले . मग रेशनिंग , काळाबाजार , भयानक संहार , अनेक उलथापालथी - केवळ मुंबईतच नव्हे तर साऱ्या जगातच एक प्रचंड सांस्कृतिक - राजकीय - आर्थिक परिवर्तन झाले . अठरा पगड मुंबई अठराशे पगड झाली . जुन्या मुंबईत डोक्यावरच्या पगडीवरून माणसाची जात सांगता येत असे . पगडीने डोक्याच्या वरच्याच नव्हे तर आतल्या भागाचाही ताबा घेतला होता . इंग्राजाच्या गुलामीमुळे हॅट आणि जातीच्या गुलामीमुळे पगडी . त्यातच ` खानदाना ' च्या कल्पना साठलेल्या होत्या . त्या फारशा शहाणपणाच्या होत्या असे नव्हे . पण ज्यांच्या गाण्याला जाण्यामुळे त्या खानदानीपणाला बाध न येता तो वाढतो अशा ज्या काही मोजक्याच
गायिका होत्या . त्यांत माझ्या लहानपणी केसरबाई अग्रगण्य होत्या . त्यापूर्वी अंजनीबाई मालपेकर यांना असाच मान होता .श्रीमंतांघरच्या लग्नांत ` केसबाईचे गाणे ' ही एक अट होती . वरमाईच्या रूबाबाला खाली पाहायला लागेल अशा थाटात केसरबाई गायला यायच्या . दिवसभर मांडवात व्याही -विहिणींनी काय मानपान करून घ्यायचे असतील ते घ्यावे ; रात्री एकदा केसरबाईचे गाणे सुरू झाले की त्या मांडवातील अनभिषिक्त राणी म्हणजे केसरबाई . लग्नाच्या मांडवातल्या आयाबायांना कळणारे ते गाणे नव्हते , किंबहुना जे मातबर यजमान ते गाणे ठरवीत त्यांनाही त्यात गम्य असेच असेही नाही . त्यांच्या आवडीचे गाणे निराळे असले तरी तसली फर्माइश
ह्या गायिकेला चालणार नाही याची त्यांना खात्री असे . आणि समोर बसलेल्यांच्या आवडी निवडी ध्यानात घेऊन गाणे , हा प्रकार केसरबाईनी आयुष्यात कधी केली नाही . खानदानाविषयक तत्कालीन कल्पनेचाच हा भाग . चिवडा आणि बनारसी शालू एका ठिकाणी विकत घ्यायची सोय असणारी . डिपार्यमेटल स्टोअर्स त्या काळी निघाली नव्हती . चिवडेवाला आपले खानदान सांभाळून आणि बनारसी शालूवाला आपले .

मी केसरबाईंना प्रथम पाहिले ते ग्रांट रोडजवळच्या मुझफराबाद हॉलमध्ये . अशाच एका लग्नातल्या गाण्यात . श्रीमंत घरातले लग्नसमारंभ ह्या मुझफराबाद हॉलमध्ये होत . हंड्या - झुंबरे - गालिचे - रूजामे असा नबाबी थाट तिथे असायचा . अंगणात ` पीकॉक ' किंवा पोलीस ब्यांड ` इट्सस ए लॉग लॉग वे टु टिपरारी ' हे गाणे पहिले महायुध्द संपले तरी वाजवणारा . असल्या त्या मुझफराबाद हॉलमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे केसरबाईच्या आयुष्याला किती विलक्षण कलाटणी मिळाली होती ह्याची हकीकत त्यांनीच मला सांगितली होती .

एका विलक्षण योगामुळे केसरबाईच्याबरोबर रोज पाच - सहा तास असे दहा - बारा दिवस दादरच्या शिवाजी पार्कजवळच्या त्यांच्या घरी मला घालवायला मिळाले . सात - एक वर्षांपूर्वीची गोष्ट . शांतिनिकेतनातील श्री . शर्वरी रायचौधुरी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार संगीताचे परमभक्त . अक्षरशः चार - पाचशे तासांचं ध्वनिमुद्रित संगीत त्यांच्या सग्रंही आहे . केसबाईशी
माझा परिचय आहे हे कळल्यावर ह्या माझ्या मित्राने माझ्या मागे टुमणे लावले : "" काहीही करा आणि केसरबाईना मला सिटिंग द्यायला सांगा . मला त्यांचा अर्धपुतळा करायचा आहे . ""
हे म्हणजे धर्मसंकट . केसरबाईना ` तुम्ही अमुक एक करा ' असे सांगणेही असक्य कोटीतली गोष्ट .

No comments: